फुले समाधान या ब्रीडर जातीचे गव्हाचे बियाणे लागवड प्लॉटला बीज नोंदणी अधिकारी, सातारा श्री. मोहन होवाले यांनी भेट दिली

दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय राजमाची मधील एक एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या फुले समाधान या ब्रीडर जातीचे गव्हाचे बियाणे लागवड प्लॉटला बीज नोंदणी अधिकारी, सातारा श्री. मोहन होवाले यांनी भेट दिली यावेळी वनस्पती शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. व्ही. आर. जगदाळे व मोड्यूल मधील विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी, संचालक श्री. विलास चौधरी यांच्या  प्रोत्साहनातून तसेच प्राचार्य डॉ. के. एस. घुटूकडे यांच्या सहकार्याने बीज उत्पादन घेण्यात आले आहे.