Photogallary


दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा सन्मान

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी सलग्न दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील माजी विद्यार्थी कु. धोंडीराम मधे, कु. प्रदिप वाजे व कु. योगेश अधारी या विद्यार्थ्यांचा त्यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल प्रतिष्ठानचे सचिव श्री. अभिजित मोकाशी व संचालक श्री. विलास चौधरी यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
महाविद्यालयातील सन-२०१७ उत्तीर्ण बॅचमधील कु. धोंडीराम मध्ये या विद्यार्थ्यांची san-२०२१-२२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यकर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी या दोन्ही स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केले असून सन-२०२० उत्तीर्ण बॅचमधील कु. प्रदीप वाजे व कु. योगेश अधारी या विद्यार्थ्यांची पदव्युत्तर परीक्षेमध्ये उज्वल यश त्याचबरोबर आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या कृषी अधिकारी परीक्षेमध्ये अंतिम फेरीसाठी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयामार्फत सन्मान करून अभिनंदन करण्यात आले मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलातील प्रवेशित विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी माजी विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन पर व्याख्यान आयोजित केली जाते यावेळी प्रतिष्ठानचे सचिव श्री. अभिजीत मोकाशी उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी व संचालक श्री. विलास चौधरी उपस्थित होते त्याचबरोबर सर्व घटक महाविद्यालयांचे प्राचार्य ए. एस. ढाणे, डॉ. एस. एम. शिंदे, डॉ. पी पी पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
 

दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न

              महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची *कोर्स नंबर EDNT- 242 एज्युकेशनल टूर* अंतर्गत दक्षिण भारतातील तेलंगणा राज्याची राजधानी व दख्खन पठारावरील साहित्यिक शहर हैदराबाद या ठिकाणी बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 ते रविवार दिनांक 15 जानेवारी 2023 या चार दिवसांमध्ये आयोजित करण्यात आले होती यामध्ये 34 मुली व 74 मुले यांनी सहभाग नोंदवला.
या सहली दरम्यान समृद्ध शिक्षण व संशोधन, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्य वारसा असलेल्या हैदराबाद शहरातील प्रसिद्ध *गोलकोंडा किल्ला* या ठिकाणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ट्रेकिंगचा अनुभव घेतला त्याचबरोबर विविध रंगांची फुले, झाडे व झुडपे असणाऱ्या *एनटीआर गार्डन* या 36 एकर क्षेत्रावरती पसरलेल्या आकर्षक स्थळास भेट दिली आधुनिक शैलीचे शहरी उद्यान *लुबिनी पार्क* मधील नेत्र दीपक लाईट वर साऊंड असून भगवान बुद्धाला समर्पित उद्यान त्याचबरोबर हैदराबादच्या वैभवात ऐतिहासिक महत्त्व असलेली वास्तू *चारमिनार* हुसेन सागर लेक च्या बाजूला उंच टेकडीवरील पांढऱ्या शुभ्र संगमरवरी बांधकामात नक्षीकाम केलेले *भगवान वेंकटेश्वरांचे बिर्ला मंदिर* जगातील सर्वात मोठा चित्रपट निर्मितीचा 1500 एकर परिसरातील विलोभनीय पर्यटन व मनोरंजन स्थळ *रामोजी फिल्म सिटी* की जो फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स गिनीज बुक मध्ये नोंद आहे याचबरोबर *भारतीय कृषी अनुसंधान परिषद* स्थापित विस्तार शिक्षण संस्था (EEI), भात संशोधन संस्था (RRI), भारतीय अन्नधान्य संशोधन संस्था (IIMR) यास अभ्यासपूर्ण भेट दिल्या.
            याप्रसंगी मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री अभिजीत मोकाशी उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी व संचालक श्री. विलास चौधरी सर यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले या शैक्षणिक सहलीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. शिंदे यांचे मार्गदर्शन त्याचबरोबर प्रा. बी.बी. चव्हाण प्रा. व्हि.पी. गवळी व प्रा. वाय. सी. माने यांच्या सहकार्याने नोंदणीकृत विद्यार्थ्यानी अभ्यास दौरा यशस्वीपणे पूर्ण केला.

“बेस्ट एग्रीकल्चर कॉलेज इन महाराष्ट्र” – दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलाच्या शिरपेचात आणखी एक अभिमानाचा तुरा

मुंबई: शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट सेवा व योगदाना बद्दल  दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची “बेस्ट एग्रीकल्चर कॉलेज इन महाराष्ट्र” साठी पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. भगत सिंग कोश्यारीजी यांच्या हस्ते मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान चे सचिव श्री. अभिजीत मोकाशी व उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी यांना प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, रस्ते व महामार्ग मंत्री भारत सरकार श्री. नितीनजी गडकरी, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री भारत सरकार श्री. रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री. राहुल नार्वेकर, राज्य शिक्षण मंत्री भारत सरकार डॉ. सुभाष सरकार, राज्य कायदा व न्यायमंत्री भारत सरकार प्रा. एस. पी. सिंग बागेल, भारतीय फिल्म अभिनेत्री व माझी संसद सदस्य श्रीमती जया प्रदा यांची प्रमुख उपस्थिती होती.
दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये विविध घटक महाविद्यालया मार्फत विविध अभ्यासक्रम शिकवले जातात.
शुक्रवार दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२२ रोजी ट्रायडेंट हॉटेल, मुंबई याठिकाणी एशिया टुडे रिसर्च व मीडिया यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या एज्युकेशन प्राईड समित अँड अवार्ड – २०२२ (शिक्षण अभिमान आणि शिखर पुरस्कार-२०२२) यामध्ये वैयक्तिक व संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट सेवा व योगदाना बद्दल  दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची “बेस्ट एग्रीकल्चर कॉलेज इन महाराष्ट्र” साठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 यावेळी संस्थेचे संचालक श्री विलास चौधरी उपस्थित होते.  
दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलाच्या भरीव योगदाना बद्दल सर्व घटक महाविद्यालयातील प्राचार्य प्रा. ए. एस. ढाने ,डॉ. एस. एम. शिंदे, डॉ. पी. पी. पाटील,प्रा. एस. ई. जगताप, प्रा. पवार एस.एम., प्रा. डी. एस. सूर्यवंशी, व प्रा. एस. एन. सूर्यवंशी व सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या वतीने अभिनंदन व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा.


आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान कराड

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, दादासाहेब मोकाशी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय व दादासाहेब मोकाशी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतर महाविद्यालय हॉलीबॉल स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक 01/10/2022 रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलाच्या क्रीडांगणावरती पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रणजित पाटील पोलिस उपअधीक्षक कराड, डॉ. दिलीप गुरव मुख्य कार्यकारी अधिकारी कराड अर्बन बँक, श्री. बाबासाहेब कदम चेअरमन जिल्हा दूध संघ व संचालक किसनवीर सह. सा. कारखाना, श्री. विजय गोडसे सहा. पोलिस निरीक्षक, श्री. आर. टी. स्वामी उद्योजक कराड, डॉ. आर. आर. सूर्यवंशी अधिष्ठाता कृषि महाविद्यालय कोल्हापूर, डॉ. एस. बी. खरबडे अधिष्ठाता कृषि महाविद्यालय कराड, श्री. डी. एम. गायकवाड क्रिडा अधिकारी राहुरी, प्रा. सचिन चव्हाण राष्ट्रीय खो- खो पंच, डॉ. एस. एल. राठोड, डॉ. डी. व्ही. दहाट, श्री. राजेंद्र शेलार सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,निवड समितीचे के. डी. चंदुरे व प्रा. दादासाहेब मगदूम तसेच सातारा व्हॉलीबॉल असोसिएशन चे पंच यावेळी उपस्थित होते. तसेच संस्थेचे सचिव श्री अभिजीत मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी, संचालक श्री विलास चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. एन. सूर्यवंशी यांनी केले.


Ganeshotsav 2022

The festival celebrates Ganesha as the God of New Beginnings and the Remover of Obstacles as well as the god of wisdom and intelligence and is observed throughout India, especially in the states such as Tamil Nadu, Maharashtra, Karnataka, Kerala, Andhra Pradesh and Goa.


Other Photos

SIMPLY GALLERY NOT AVAILABLE